
औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
खरे तर उन्हाळ्याची सुट्टी लागली की गावाला जायची ओढ काय थांबू देणारी नसते. मामाचे गाव हे तर फिक्सच असतं मग काय लगबगिनी गावाला जायची तयारी होयची कपडे भरायचे पिशवी भरून तयारी होयची मग त्या नव्वद च्या काळात प्रवासासाठी मात्र बीएमडब्ल्यू सारखी वाटणारी काळी पिवळी जीप गाडी स्टॅन्ड वर उभी असायची त्यात ड्रायव्हरने प्रवासी येण्यासाठी दिलेली आरोळी म्हणजे लाजवाबच, त्यात ड्रायव्हरने लावलेली गाडीत जुनी गाणी ड्रायव्हर हू म्हणून प्रवासी गाडीत कोचायचा लहान मुले मांडीवर घ्या हा फिक्स डायलॉग वडापवाल्या ड्रायव्हरचा असायचा गाडी पुढे गेल्यानंतर ड्रायव्हरला पुन्हा पोलिसांची भीती असायची गाडीला मागे लटकलेली माणस पुन्हा ड्रायव्हर आज सरकून बसा पुढे पोलीस आहेत नंतर पुन्हा उभा रहा असा म्हणून मोकळा व्हायचा हा प्रवास म्हणजे काय साधासुधा नव्हता मागे बसलेल्या माणसांचे गाव आल्यानंतर त्याकाळी काय गाडीत बेल नसायची मोठ्याने गाडीवर फटका मारत हो हो गाव आल म्हणत माणस उतरायची त्यात पुन्हा प्रवाशांची आणि ड्रायव्हरची लहान मुलांच्या तिकीट वरून शाब्दिक चकमक होणार हे ठरलेले असायच त्यात आता उतरण्यासाठी तेवढ्याच सर्व माणसांनी खाली उतरायचे त्यातील एक माणूस खाली उतरणार आणि पुन्हा तेवढीच माणसं गाडीत बसायची असा कसा तरी हा प्रवास चालू राहायचा यामध्ये खरंतर दोन तासाचा प्रवास अगदी चार तासाचा होयचा पण खरंच तेच दिवस खूप छान होते अलीकडच्या काळात सगळं बदललेलं असताना सुद्धा त्याकाळी वडाप जीप गाडीने केलेल्या प्रवासाची सर आत्ताच्या बीएमडब्ल्यू गाडीतून होणार नाही हे नक्कीच ज्या कोणी लोकांनी हा वडापजीप गाडीचा प्रवास केला आहे त्यांना त्यांचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत.