
म्हसवड दि. ७
म्हसवड प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदी महेश कांबळे यांची तर उपाध्यक्ष पदी सचिन सरतापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांच्या अध्यक्षतेखाली व माण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दौलत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत म्हसवड प्रेस क्लब ची कार्यकारिणी निवड करण्यात आली यामध्ये प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदी महेश कांबळे यांची, उपाध्यक्ष पदी सचिन सरतापे यांची, खजिनदारपदी विजय टाकणे यांची तर प्रेस क्लब च्या सचिवपदी सचिन शिंगाडे यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार एल.के. सरतापे, नागनाथ डोंबे, शंकर पानसांडे, धनंजय पानसांडे, शहाजी लोखंडे, आण्णासाहेब कोळी आदी पत्रकार उपस्थित होते. सर्व नुतन पदाधिकार्यांचे जेष्ठ पत्रकार सलीम पटेल, दिलीप किर्तने, विजय भागवत, अजित काटकर, पोपट बनसोडे, सचिन मंगरुळे, अहमद मुल्ला, सुशील त्रिगुणे आदींनी अभिनंदन केले.