म्हसवड (प्रतिनिधी )-
सातारा पंढरपूर या राज्य महामार्गावरील विविध ठिकाणी अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करा अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी पुणे कार्यालया तील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता पुणे कार्यालय श्रीमती अश्विनी घोडके यांना समक्ष दिले.
सातारा पंढरपूर या रस्त्याचे बहुतांशी काम 6 वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. मात्र अनेक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे काम अपूर्ण असल्याने त्याचा फटका प्रवासी व वाहनधारकांना बसत असल्याचे प्राध्यापक बाबर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
म्हसवड नजीकच्या दिवड हद्दीतील साखळी पुलाचे काम तसेच मानगंगा नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असून ते संथ गतीने सुरू आहे. धुळदेव गावा नजीक दोन ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. या अपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले असून वाहनाचे घोटाळे ही वाढत आहेत.
म्हसवड शहर हद्दीतील या रस्त्याची लांबी अंदाजे दोन किलोमीटर असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारे काढलेली नाहीत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे म्हसवड बस स्थानका नजीकच्या दुकान गळ्यात पाणी शिरल्याने अनेक व्यवसायिक व व्यापाऱ्याची प्रचंड नुकसान झाले याला जबाबदार कोण असा हे प्रश्न प्राध्यापक बाबर यांनी केला. या रस्त्यावरील पिंपरी गोंदवले व इतर गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारी काढली मग म्हसवड मध्येच गटारीचे काम अपूर्ण का ठेवले ?
असा प्रश्न केला असता नगरपालिका प्रशासन व रस्ते विकास महामंडळातर्फे सदर काम लवकरच केले जाईल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके यांनी कृषिरत्न विश्वंभर बाबर यांना दिली.
सातारा पंढरपूर रस्त्याचे अर्धवट काम तातडीने पूर्ण करा -प्रा. विश्वंभर बाबर