



महाबळेश्वर वार्ताहर/मिलिंद काळे
शिवसेना ऊ बा ठा महाबळेश्वर शहराच्या वतीने मुंबई मधील २६/११ च्या भ्याड दहशतवादी हल्यातील सर्व शहिद जवानांना महाबळेश्वरचे PSI रुपाली काळे.वैभव भिलारे यांच्या हस्ते मेणबत्ती प्रचलित करून विनम्र अभिवादन आणि श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली.
पाकिस्तानी दहशतवादी क्रूरकर्मा अजमल कसाब व त्याचे सहकारी यांनी मुंबई व मुंबई परिसरात केलेल्या भ्याड हल्ल्यातील शेकडो भारतीय नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाले व सातारा जिल्ह्यातील शहीद तुकाराम ओंबळे,विजय साळसकर,अशोक कामटे,हेमंत करकरे व शहीद पोलिस जवान यांनी केलेल्या देशा साठी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबईसह महाराष्ट्राला पुनर्जन्म दिला.अशा शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी शहराच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये शहीद जवानांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक यशवंत घाडगे,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे, शिवसेना महिला आघाडी संघटक राजश्री भिसे , महिला शहरप्रमुख बगाडे, शहरप्रमुख राजा भाऊ गुजर, प्रभाकर कुंभारदरे, सतिष प्रभाळे,अर्बन बॅंक संचालक जावेद वलगे, युवासेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, शुभम कुंभारदरे,उपशहरप्रमुख उस्मान खारकंडे,उपशहरप्रमुख राजेश साळवी,रणजीत तांबे, अंकित पल्लोड, डेमोक्रोटी उच्च जिल्हाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे, रमेश शिंदे,अशोक शिंदे, शाहनवाज खारकंडे, प्रविण कदम,शिरिष गांधी, प्राध्यापक कोरे सर,अंकुश उल्लाकर, स्वामी वाईकर, ज्येष्ठपत्रकार विलास बापू काळे, प्रेषित गांधी, राहुल शेलार,राजेश सोंडकर, रियाज मुजावर, मिलिंद काळे आणि पर्यटक व महाबळेश्वर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितीत होते