
मुरूम वार्ताहर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जय मल्हार युवक मंडळाच्या वतीने रविवारी (दि.८) शहरातील प्रमुख मार्ग डॉ. आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक,हनुमान चौका पर्यंत अहिल्यादेवी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णांकर्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सपोनि नवनाथ गाडेकर, सुधीर चव्हाण, श्रीकांत बेंडकाळे, जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बिरू ढंगापुरे, उपाध्यक्ष राम चेंडके आदी
