गोंदावले -भारतीय मजदूर संघाच्या 70 वा वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम गोंदवले खुर्द ता. माण या ठिकाणी संपन्न झाला.
गोंदवले या ठिकाणी भगवान विश्वकर्मा, भारत माता,श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या फोटोचे पूजन केले. भारतीय मजदूर संघाच्या ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण श्री राजेंद्र काळे (कार्याध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय मजदूर संघाचे सभासद व शासनाकडे नोंदीत असणाऱ्या बांधकाम कामगारांची एक भव्य शोभायात्रा गावामधून काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन ते गोंदवले खुर्द एसटी स्टँड पासून मारुती मंदिर परत आंबेडकर भवन असा रॅलीचा मार्ग होता. भारतीय मजदूर संघाचा विजय असो, भारत माता कीजय, वंदे मातरम, देश के हित मे करेंगे काम, बी एम एस जिंदाबाद, हया घोषणा देण्यात आल्या या रॅलीची सांगता गोंदवले गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये झाली. रॅलीच्या सांगता सभेत मा. श्री राजेंद्र काळे यांनी भारतीय मजदूर संघ स्थापनेपासून आजपर्यंतचा सर्व इतिहास, रीती नीती पद्धती, कार्यपद्धती यावर मार्गदर्शन केले. श्री रविंद्र माने यांनी शासनाने देऊ केलेल्या बांधकाम कामगारांच्या योजना यांची विस्तृत स्वरूपात माहिती सांगितली. श्री विनोद केंजळे यांनी उपस्थित बांधकाम कामगारांच्या अडचणी व त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. कृष्णाई हॉस्पिटल चे डॉ श्री सागर खाडे साहेब यांनी हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या बांधकाम कामगारांच्या आरोग्य विषयक सुविधा याबाबत मार्गदर्शन केले तसेच भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
शासनाकडे नोंदणीत असलेल्या बांधकाम कामगारांचे आरोग्यात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 80 बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. माण तालुक्यातून कार्यक्रमासाठी 140 ते 150 महिला व पुरुष यांनी सहभाग दर्शवला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाची जबाबदारी सौ रेश्मा शीलवंत (उपाध्यक्ष) महाराष्ट्र प्रदेश तसेच माण तालुक्यातील सर्व कामगार प्रतिनिधी यांनी पार पाडली. श्री अरविंद इंजे,श्री गणेश वायदंडे,अश्विनी सातपुते, उज्वला इंजे, श्री कुमार वायदंडे, श्री विक्रम शिंदे,श्री सनी तुपे,ए.के.नामदास यांचे विशेष सहकार्य लाभले.
छाया – वर्धापन सोहळ्यात सहभागी झालेले सनि तुपे, ए.के.नामदास व मान्यवर
भारतीय मजदूर संघाचा वर्धापन दिन सोहळा थाटामाटात साजरा
