औंध प्रतिनिधी – ओंकार इंगळे
सशक्त पंचायत, समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्र भर राबत असताना मात्र खटाव तालुक्यातील औंध गाव मात्र गेले दोन ते तीन वर्षे झाले कचऱ्याच्या विळख्यात अडकले आहे.
गेले काही वर्षे झाले औंध गावात कचऱ्या चे संकलन करण्याची क्रिया बंद पडली आहे त्यामुळे सामान्य लोकांना अनेक आजाराणा सामोरे जावे लागत आहे.
गावात अनेक साथीचे रोग वाढत आहेत.त्यामुळे गावातील लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. उघड्यावर कचरा वाढल्याने मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे.जिते तीते कचऱ्या चे गावात साम्राज्य वाढले आहे.औंध कचरा विल्हेवाट प्रश्न कोर्टात असला तरी कचऱ्याची तात्पुरती का होईना वेल्हेवाट लावणे गरजेचे आहे याचा विसर औंध ग्रामपंचायतीला तर गावात पुढारी म्हणून घेणाऱ्या व्यक्तींना पडला आहे असा संतप्त सवाल औंध ची जनता सोशल मीडिया ग्रुप वर करत असताना दिसत आहे.
औंध गावातील जनतेला न्याय कोण दिल. कचरा प्रश्न मार्गी लागेल कि नाही असे अनेक विषयांची चर्चा औंध मधील जनते मध्ये दबक्या आवाजात होत असताना दिसत आहे.
येणाऱ्या काळात निवडणुकीच्या लालसाने का होईना औंध गावच्या रखडलेल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागवा आशी आस मात्र औंध ची जनता धरून बसली आहे.