म्हसवड…प्रतिनिधी
क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल ची विद्यार्थिनी संस्कृती जयंत ढाले हिची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा सातारा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. 42 ते 44 वजनी गट व 17 वर्षाखालील स्पर्धेत संस्कृती जयंत ढाले हिने अटीतटीच्या जिल्हास्तरीय अंतिम बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. संस्कृती ढाले ही क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल म्हसवड इयत्ता आठवी मध्ये शिकत असून शाळेचे प्राचार्य विन्सेंट जॉन यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर , समन्वयक अभिजीत सावंत क्रीडाशिक्षक चंद्रकांत तोरणे , शिक्षक, पालक यांनी संस्कृती ढाले हिचे अभिनंदन केले.
संस्कृती ढाले ची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड.