म्हसवड वार्ताहर
म्हसवड येथे इंजि. सुनील पोरे व करणभैय्या पोरे या पिता पुत्राच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याकरिता रक्तदान हे राष्ट्रीय कार्य करावे असे आव्हान ऍड. शुभम पोरे यांनी केले आहे.
शुभम भारतगॅस एजन्सी मध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 4 चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
श्री संत नामदेव समाजभूषण पुरस्कार प्राप्त तसेच नामदेव समाज परिषदेचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे तसेच भाजप ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष करणभैय्या पोरे कुटुंबीयांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केलेले आहेत कोरोना काळ असेल दुष्काळी परिस्थिती असेल किंवा ज्या ज्या वेळी सामाजिक अडचणी निर्माण होतील त्या त्यावेळी हे कुटुंब मदतीसाठी पुढे सरसावलेले असते. याचाच एक भाग म्हणून वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठदान समजून रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी व राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा असे आव्हान जनश्री फाउंडेशनचे वतीने एडवोकेट शुभम पोरे यांनी केले आहे
इंजिनिअर सुनील पोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 11 रोजी रक्तदान शिबीर
