दहिवडी वार्ताहर
पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलिसांनी उत्तम कामगिरी केलेली आहे याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आलेला आहे दहिवडी पोलीस स्टेशनचे येते आहे अक्षय सोनवणे यांनी व त्यांच्या सहकार्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय असून गेल्या दोन वर्षांमध्ये अतिशय उत्तम असं काम केलेले आहे.
दहिवडी पोलीस स्टेशनला माहे नोव्हेंबर 2024 चे एकूण 2 पुरस्कार प्राप्त
नोव्हेंबर 2024 मध्ये दहिवडी पोलीस ठाणे यांनी महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल या सर्वोत्तम कामगिरीसाठी बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती असे 2 पुरस्कार माननीय पोलिस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते देण्यात आले*
सदरची कामगिरी
1)सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे2)विलास कुऱ्हाडे3)नीलम रासकर4)तानाजी चंदनशिवे यांनी केली आहे..