दहिवडी वार्ताहर
जागतिक मृदा दिनानिमित्त गुरुवार दि.५ डिसेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील; विज्ञान केंद्र कालवडे, कराड येथे नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यात मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी कराडचे उपविभागीय कृषि अधिकारी समीर पवार,केंद्रीय कुक्कुट पालन संस्था मुंबई चे सहाय्यक निदेशक डॉ.सुदर्शन शेट्टी,कृषि विज्ञान केंद्र कालवडे चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.भरत खांडेकर,कराड तालुका कृषि अधिकारी ,श्री दत्तात्रय खरात,पाटण तालुक्याचे कृषि अधिकारी श्री.विठ्ठल बांबळे,कृषि अधिकारी मिरज बोडके,कृषि सहाय्यक कराड सौ.रजनी शिंदे इत्यादी मान्यवरांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी कृषि विज्ञान केंद्र कालवडे मधील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता.
कराड व पाटण तालुक्यातील एकूण ७ शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जमीन आरोग्यपत्रिकेचे वाटप करणेत आले.केंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या माती व पाणी परीक्षण सोयीचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा व आपल्या जमिनीचे आरोग्य संभाळावे तसेच शासनाच्या विविध योजनाचा देखील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी डॉ.भरत खांडेकर म्हणाले की,आज ५ डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की, सर्वसामान्यांनाही मातीचे महत्त्व कळावे व जागृत व्हावे आणि आपल्या जीवनातील मातीचे महत्त्व समजावे आणि त्याचे संवर्धन का आवश्यक आहे. दरवर्षी ५ डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जीवनातील मातीचे महत्त्व समजून घेणे हा आहे. मातीचे संवर्धन जीवनासाठी खूप महत्वाचे आहे. माती जीवनासाठी महत्त्वाची आहे कारण ती वनस्पतींच्या वाढीस मदत करते. आणि, हे अनेक कीटक आणि प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.
अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चार अत्यावश्यक ‘जगण्याच्या’ घटकांचा तो स्रोत आहे. त्यामुळे मृदसंधारण आवश्यक आहे. या कारणास्तव, ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो, ज्यामुळे मातीच्या नुकसानाबद्दल जागरुकता निर्माण होते.यावेळी त्यांनी ‘जागतिक मृदा दिन’ साजरा का आणि केव्हा सुरू झाला,या दिवसाचे इतिहास आणि महत्त्व उपस्थितांना श्री खांडेकर यांनी थोडक्यात समजावून सांगितले.