म्हसवड वार्ताहर
गावाकडे सुट्टी वर आलेल्या जवानाने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे वरकुटे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश विलास माने वय 27 वर्ष राहणार- वरकुटे म्हसवड तालुका-माण जिल्हा सातारा
याने मौजे वरकुटे म्हसवड तालुका- माण जिल्हा- सातारा गावचे हद्दीत स्वतःचे घरातनवीन रूमचे लोखंडी अँगला दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.
त्याचा चुलत भाऊ सचिन महादेव माने यांनी म्हसवड पोलीसात याबाबत माहिती दिली आहे. यानुसार म्हसवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास एपीआय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फडतरे हे करीत आहेत.