
म्हसवड (वृत्तसेवा)
म्हसवड तालुका माण येथील ईदगाह मैदानावर मानकरी जनाब गब्बारभाई हिदायतुल्ला काझी यांच्या मार्गदर्शनाखाली जनाब मोईनुद्दीन पठाण कारी सहाब यांनी बकरी ईदचे महत्त्व सांगितले व नमाज पठण केले , नमाज पठणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडला. नमाज पठणास म्हसवड व परिसरातील बहुसंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते सदर वेळी म्हसवड पोलिस स्टेशन चे API श्री.अक्षय सोनवणे साहेब व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.

मुस्लिम समाजाच्या वतीने जनाब गब्बारभाई काझी यांच्या हस्ते API श्री. अक्षय सोनवणे साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला , त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच म्हसवड मधील सर्व हिंदू बांधवांनी देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या.