नागपूर येथे 12 जून रोजी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा जाहीर सत्कार सोहळा

Spread the love

संत कबीर जयंतीनिमित्त श्री. गुरुदेव सेवामंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे/नागपूर – आधुनिक सत्यशोधक चळवळीचे प्रेरणास्थान ठरलेले पुणे येथील फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे सद्श्य समाजसेवक रघुनाथ ढोक यांचा 12 जून 2025 रोजी नागपूर येथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संत कबीर यांच्या 627 व्या जयंतीनिमित्त सायं. 6.30 वाजता, श्री. गुरुदेव सेवाश्रम, सुभाष रोड, नागपूर येथे पार पडणार आहे.
या सत्काराचे आयोजन श्री. गुरुदेव सेवामंडळ, नागपूर तर्फे करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँड. अशोक यावले (अध्यक्ष, गुरुदेव सेवामंडळ) राहणार आहेत. सचिव विठ्ठलराव पुनसे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सत्यशोधक रघुनाथ ढोक हे विज्ञानयुगातही अंधश्रद्धा, मुहूर्त, कर्मकांड यामुळे होणाऱ्या आर्थिक व मानसिक नुकसानीविरोधात गेली अनेक वर्षे सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश आणि वास्तू विधी विनामूल्य पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सत्यशोधक चळवळीला नवे बळ प्राप्त झाले आहे.
ढोक यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र व तेलंगणात एकूण 53 सत्यशोधक विवाह व 14 वास्तू / गृहप्रवेश विधी मोफत पार पाडले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत कार्यरत राहत त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले गीतचरित्र आदी महत्त्वपूर्ण पुस्तकेही प्रकाशित केली आहेत. पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लिपिक पदावर कार्यरत असूनही, त्यांनी समाजकार्याची ज्योत अखंड पेटवून ठेवली आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पदवाड, श्री. रुपराव वाघ, डॉ. गणेश चव्हाण, श्री. रामराव चोपडे, श्री. सुरेंद्र बुराडे, श्री. बंडोपंत बोढेकर, श्री. दिलीप सुरकार यांची उपस्थिती लाभणार आहे.
संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष सौ. संगीता जावळे, सहसचिव राजेश कुंभलकर, कोषाध्यक्ष सात्विक ठवरे, प्रचारप्रमुख सियाराम चावके, सदस्य प्रा. रामदास टेकाडे, प्रभाताई ठवकर आदी मान्यवर सहभागी राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!