सासूचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Spread the love
आरोपी आबासो काटकर.

म्हसवड प्रतिनिधी
नरवणे तालुका माण येथील आबासो बबन काटकर* वय – 42 वर्ष रा.नरवणे ता.माण जि.सातारा यांने घटस्फोट देण्याच्या कारणावरून सासू रंजना हणमंत भोसले राहणार कुकूडवाड तालुका माण हिचा चाकूने वार करून 22/03/2018 रोजी खून केला होता.
याप्रकरणी म्हसवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.

थोडक्यात हकीकत – वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी ही तिची नणंद जखमी वैशाली आबासो काटकर व मयत सासू रंजना हणमंत भोसले असे अंगणात लसूण सोलत बसले असताना फिर्यादीची नणंद वैशाली यांचे पती आरोपी आबासो बबन काटकर हे त्या ठिकाणी आले व नणंद वैशाली यांना घटस्फोट देण्याचे कारणावरून त्यांनी नणंद वैशाली व मयत सासु रंजना यांना शिवीगाळ दमदाटी केली असता फिर्यादीचे सासू मयत रंजना यांनी आरोपी आबासो बबन काटकर यास शिवीगाळ करायचे नाही असे म्हणाले असता फिर्यादीची नणंद वैशाली यांचा नवरा आरोपी आबासो बबन काटकर याने फिर्यादीची सासू रंजना यांना आता तुला दाखवतो असे म्हणून त्याने त्याचे हातातील पिशवीतून लाकडी मूठ असलेला सुरा काढला आणि फिर्यादीची सासू मयत रंजना यांचा गळा धरला म्हणून फिर्यादी व जखमी नणंद वैशाली असे सोडवण्यास गेले असता आरोपी आबासो बबन काटकर यांनी फिर्यादीस तू मध्ये पडायचे नाही तुझा आणि माझा संबंध नाही असे म्हणून फिर्यादी व जखमी नणंद वैशाली यांना ढकलून दिले व फिर्यादीची सासू मयत रंजना यांना गळ्याला धरून घरामध्ये नेले त्यावेळी फिर्यादी जोरात ओरडलेने त्या ठिकाणी फिर्यादीचे शेजारी राहणाऱ्या त्यांच्या चुलत सासू सुनिता या आल्या त्या दोघी आतमध्ये जात असताना नणंद वैशाली या सासु मयत रंजना यांना आरोपी आबासो बबन काटकर यांचे ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचे छातीवर कपाळावर हातावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व चुलत सासू सौ.सुनीता यांनी मयत सासू रंजना यांना सोडविण्यासाठी आरोपी आबासो बबन काटकर याला आवडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही कानाखाली मारून ढकलून देऊन मयत सासू रंजना यांचे जबड्याखाली , मानेवर , काखेत , छातीवर , पोटावर , पाटीवर चाकूने वार करून जीवे ठार मारले व चाकू त्याच ठिकाणी टाकून पळून गेला म्हणून वगैरे मजकुराची खबर दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला
सदर गुन्ह्यात सहा.पो.नि.श्री. मालोजीराव देशमुख यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले सदर कामी पो.हवा.99 एस.एस.सानप यांनी मदत केली व कसून तपास करून आरोपींविरुद्ध मा.अति.जिल्हा व सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति.जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील श्री.वैभव हरीश काटकर यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.व्ही.हुद्दारसो यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम 302 , 324 , 323 अन्वये दोषी ठरवून आज दि.17/05/2025 रोजी आरोपी – आबासो बबन काटकर वय – 42 वर्ष रा. शिवाजीनगर (कुकुडवाड) ता.मान जि.सातारा यास
भा.द.वि.स कलम 302 अन्वये जन्मठेप व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद भा.द.वि.स कलम 324 अन्वये 3 वर्ष सक्तमजुरी भा.द.वि.स कलम 323 अन्वये 6 महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.

सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी मा.अश्विनी शेंडगे(मॅडम), स.पो.नि. अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाड पो.उप. नि.दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. 2086 विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. 292 अमीर शिकलगार, पो.कॉ.585 सागर सजगणे व पो.कॉ. 2414 जयवंत शिंदे, यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!