
औंध प्रतिनिधी- ओंकार इंगळे
बकरी ईद या सणाचे औचित्य साधून औंध मध्ये सामाजिक कार्यकर्ते आलीम मोदी व त्यांची मुलगी ऍडव्होकेट यास्मिन मोदी यांच्या माध्यमातून एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच इयत्ता दहावीचा निकाल लागला यामधील औंध गावातील काही विद्यार्थी यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत याचीच दखल घेत ऍड यास्मिन मोदी यांनी या मुलांचा सत्कार घेतला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यामध्ये श्रेया यादव,स्वप्नाली यादव, आर्यन यादव,अथर्व यादव,प्रणव करपे,अनिकेत यादव,गौरी सकट, आयुष्य कुंभार,प्रणव सुतार या विद्यार्थ्यांचा समावेश होता
यावेळी कार्यक्रमास औंध गावातील प्रमुख मान्यवरांनी हजेरी लावली होती यामध्ये ग्रामपंचायत सदस्य वसंत मेजर उद्योजक बाबा गोसावी चंदू पवार प्रवीण इंगळे निवास कुंभार सावता यादव भरतबुवा यादव प्रभाकर यादव ज्योतीराम कुंभार जगन्नाथ यादव सर भानुदास यादव तर महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे प्रस्तावना सावता यादव यांनी केली तर आभार भरत बुवा यांनी मानले