गोंदवले – प्रतिनिधी –
बिजवडी केंद्र समूहातील शाळेच्या क्रिडा स्पर्धा बिजवडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत १०० मीटर धावणे यात कुमारी वेदा विक्रम गायकवाड हीचा द्वितीय क्रमांक तसेच ६०० मीटर धावणे यात काव्या विक्रम गायकवाड हीचा द्वितीय क्रमांक आला. दोन्ही विद्यार्थिनींचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या मार्फत करण्यात आला.व पुढील बीटस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच लंगडीच्या स्पर्धेत मुलींच्या संघाचा तृतीय क्रमांक आला त्यांचेही शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले.
