
म्हसवड वार्ताहर-शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे अश्वारुढ स्मारकचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ वसंत मासाळ यांनी केले आहे
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक बांधकाम याविषयी म्हसवड येथील समाज बांधवांची आज मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.म्हसवड मध्ये भव्य असे अश्वारूढ स्मारक उभारण्यात येणार आहे.समाजातील गुणवंताचे गुणगौरव कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
कार्यक्रम रूपरेषा
दुपारी 2.00 वाजता धनगरी वेशात गजी ढोलांचा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी 5.00 वाजता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन नगरपालिकेशेजारी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.
सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याकरीता आपण बहुसंखेने उपस्थित रहावे ही विनंती.
बैठकीसाठी माण खटाव लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे मा. नगराध्यक्ष डॉ.वसंत मासाळ, युवा नेते लुणेश वीरकर,सामाजिक कार्यकर्ते विजय बनगर,मा.नगरसेवक आप्पासाहेब विरकर,अस्थिरोग तज्ञ डॉ. बाबासाहेब दोलताडे, युवा कार्यकर्ते विशाल विरकर, लक्ष्मण विरकर (करले) , कृष्णदेव मदने,पोपट मासाळ,डॉ प्रमोद गावडे,दादासाहेब दोरगे,नारायण मासाळ,रामभाऊ कोडलकर,म्हसवड मंडल चे अध्यक्ष प्रशांत गोरड,नानासाहेब दोलताडे,सचिन विरकर, यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.