जावळीकरांच्या सत्कार सोहळ्याने मंत्री महोदय भारावून गेले

Spread the love

(अजित जगताप)
पाचवड दि: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सातारा जावळीचे लोकप्रतिनिधी व बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड या ठिकाणी जावळीकरांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागताने मंत्री महोदयासह त्यांच्या समवेत आलेले भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, फिरोज भाई पठाण, अर्जुनराव जाधव व मान्यवर भारावून गेले.
रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मंत्रिमहोदयाचे जावळीच्या प्रवेशद्वारावर आगमन होणार असल्याची माहिती समाज माध्यमातून मिळाली. त्यामुळे करहर , मेढा ,सायगाव, आलेवाडी , शेते ,बामणोली, विवर कावडी, म्हसवे , सरताळे, अमृतवाडी व दरे , सोनगाव,कुडाळ परिसरातील अनेक कार्यकर्ते महामार्गावर थांबले होते. पाच तासाच्या विलंबानंतर ही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता.
या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व जे.सी.बी.च्या साह्याने पुष्पहार अर्पण करून नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे स्वागत केले. या वेळेला वसंतराव मानकुमरे, दत्ता गावडे, सतीश चव्हाण, रविंद्र परामणे, गोपाळ बेलोशे, धैर्यशील शिंदे , राजेंद्र शिंदे, श्रीमती गीता लोखंडे,,विक्रम भिलारे, राजू गोळे, हेमंत शिंदे, संजय शिंदे ,सयाजी शिंदे, भाऊसाहेब जंगम, संदीप गायकवाड ,प्रशांत कदम, जमीर शेख, सोहिल मुल्ला, शब्बीर भाई पठाण, अर्जुन निकम, मुरलीधर शिंदे, हिंदुराव तरडे, अभिजीत दुदूस्कर , संदीप गायकवाड ,संदीप परामणे यांच्यासह ग्रामीण भागातील महायुतीचे समर्थक व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. परंतु मंत्री महोदयाच्या सत्काराच्या व स्वागताच्या आनंदाच्या वातावरणामध्ये अनेकांनी ते निमूट पणे सहन केले.


फोटो- पाचवड या ठिकाणी मंत्री महोदयांचे स्वागत करताना मंत्री महोदयांनी ही आभार मानले तसेच मंत्री महोदयाची वाट पाहताना कार्यकर्ते व मान्यवर

(छाया- शहाजी गुजर ,आनेवाडी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!