आटपाडी वार्ताहर —

आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांच्या ‘ बनगी आणि बिरमुटं ‘ . या कथासंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ . श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विटा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उत्साहात पार पडले .
यावेळी प्राचार्य डॉ . दिनकर पाटील, आनंदहरी , मुरलीधर केळये , कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अवधुत कुंभार , दि . बा . पाटील, संयोजक रघुराज मेटकरी , डॉ . ऋषीकेश मेटकरी, प्रा . विश्वनाथ गायकवाड , गोविंद काळे , जिल्हयातील साहित्यिक व साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सुनील दबडे यांच्या या कथासंग्रहात माणदेशी मातीतल्या माणसांच्या वेदना आणि आनंदाचा मागोवा घेण्यात आला आहे . निसर्गाची अवकृपा ‘ कर्जबाजारी शेतकरी, शेतीमालाचा गडगडणारा भाव , बाजारपेठेकडून शेतकऱ्या ।ची होणारी फसवणूक , मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम , माणसांमाणसांतील कमी होणारी माणुसकी , कृषीसंस्कृत्तीला प्राध्यान्य देणाऱ्या उच्चशिक्षीत तरुणी, अंधविश्वास झटकून नवी विज्ञानदृष्टी जोपासणारे नवतरूण या सर्वांचा वेध कथालेखक सुनील दबडे यांनी ‘ बनगी आणि बिरमुटं या कथासंग्रहातून घेतला आहे
दबडे यांची यापूर्वी चार पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांना राज्यस्तरावरच्या अनेक साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . नवं विचार देणारं नवं पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल दबडे यांचे खानापूर कडेगाव , तासगाव, आटपाडी तसेच सांगोला परिसरांतील अनेक साहित्यिकांनी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .