पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी /अभिजीत लेभे
गावाची जिल्हा परिषद व शाळा डिजिटल शाळा बनवण्यासाठी घिगेवाडी गावाने सुरु केलेली मोहीम हि शैक्षणिक विकासाची क्रांती करणारी असून मुलांच्या सुरक्षेसाठी कार्यान्वित केलेली सीसीटीव्ही यंत्रणा हा स्त्युत्य निर्णय असून इतर गावांनी त्याचा आदर्श घेऊन गावाची शाळा सुरक्षित करावी असे आवाहन वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील घिगेवाडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद शाळेत बसवलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या उदघाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच नारायण काशिनाथ सावंत, मुख्याध्यापक संजय काळे,
माजी उपसरपंच आदिनाथ सावंत व सदस्य-संचालक,
रघुनाथ सावंत (काका), पोलीस पाटील महेंद्र घिगे,
संचालक व माजी पोलीस पाटील शामराव साळुंखे-, कल्पतरू गॅस सर्व्हिसेस रविंद्र सावंत,सदस्य, दत्तात्रय साळुंखे, निलेश सावंत, प्रतिक सावंत,दत्त नवनाथ अर्थमूव्हर्स, शिक्षिका सारिका ननावरे,सुनिता घिगे, कल्पना सावंत यांची प्रमुख उपस्थिती
होती.
यावेळी सरपंच नारायण सावंत म्हणाले, घिगेवाडी जिल्हा परिषद शाळा डिजिटल व स्मार्ट करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून भागातील सर्वोत्तम मराठी शाळा बनवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेऊ, या शाळेने गुणवत्तेची परंपरा नेहमीच कायम राखली असून शाळेला सर्वोतपरी सुविधा पुरवून भावी पिढीच्या विकासासाठी घिगेवाडी नेहमीच आघाडीवर राहील.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, मदतनीस, आजी-माजी चेअरमन-व्हा, चेअरमन, संचालक, आजी-माजी सैनिक संघटना, अध्यक्ष-उपाध्यक्ष-सदस्य स्कूल व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक, शिक्षिका-पालक-विद्यार्थी, राजमाता जिजाऊ महिला ग्राम बचत गट, कर्मवीर ग्रुप, अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन, जाणता राजा ग्रुप, गणेशोत्सव, दुर्गा माता तरुण मंडळ, आशा सेविका, सर्व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.