औंध ग्रामस्थांच्या वतीने मा. अंकुशभाऊ गोरे यांचा सत्कार
औंध प्रतिनिधी -ओंकार इंगळे

औंध : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी नंतर माण खटाव चे आमदार मा. जयकुमार गोरे यांचे मोठे बंधू अंकुश भाऊ गोरे यांची औंध ग्रामस्थांना भेट मा.अंकुश भाऊ गोरे यांनी विधान सभा निवडणुकी मध्ये औंध गटा मधून आमदार जयकुमार गोरे यांना चांगलेच जास्तीचे मताधिक्य मिळवून दिले होते. त्या मध्ये औंध मधील असणारे कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पणे काम करताना दिसून आले होते.याचे ही कवतुक मा. अंकुश भाऊ गोरे यांनी केले. मी औंध मधील कार्यकर्ते यांच्या पाठीमागे कायम खंभीर पणे उभा राहणार असल्याचे सुद्धा आश्वासन दिले. यावेळी औंध गावाचे युवा नेतृत्व संतोष भोसले,धनाजी आमले, नारायण इंगळे, अर्जुन यादव, गणेश चव्हाण, सावता यादव, मंगेश इंगळे, राजेंद्र घार्गे, जयसिंग घार्गे, पै. सनी इंगळे, केशव इंगळे, अजित माळी, निलेश खैरमोडे, सुनिल इंगळे, ओंकार माने, सोनू माने, आशिष लावंड, नितीन लावंड, गजानन यादव, रोहित खैरमोडे पै. शिवाजी जाधव व पै. निलेश फडतरे उपस्थित होते.