
म्हसवड (वार्ताहर )
श्री नागोबा ता. माण येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नागोबा देवाच्या यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ.सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांनी देवदर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी म्हसवड नगरीचे मा. नगराध्यक्ष नितीन दोशी , बाळासाहेब पिसे,युवानेते विशाल बागल, युवानेते करण पोरे यांच्यासह यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
