
प्रतिनिधी वडूज- विनोद लोहार
वडूज : खटाव तालुक्यात प्रत्येक मंडळाधिकारी स्तरावर शासनाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये नागरिकांना विविध सेवा जागीच देण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार बाई माने यांनी दिली.
यामध्ये प्रामुख्याने हस्तलिखित सातबारा प्रमाणे चालू संगणकीकृत सातबारा दुरुस्ती करणे .वारस नोंद करणे ,अ.पा.क शेरा कमी करणे ,राजपत्रांने नावात बदल करणे ,ए.कु.मँ.शेरा कमी करणे इत्यादी कामे करून दिली जाणार असून या सर्व कॅम्पचे आयोजन प्रत्येक मंडल निहाय वेगवेगळ्या दिवशी करण्यात आले असून यामध्ये पुसेगाव सोमवार दिनांक ९, कलेढोण मंगळवार दिनांक १०, बुध बुधवार दिनांक ११,खटाव गुरूवार दिनांक १२, वडूज शुक्रवार दिनांक १३, मायणी सोमवार दिनांक १६, पुसेसावळी बुधवार दिनांक १८, भोसरे गुरूवार दिनांक १९, औंध शुक्रवार दिनांक २०, निमसोड सोमवार दिनांक २३, कातरखटाव मंगळवार दिनांक २४ असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वरील सर्व कॅम्पचे आयोजन प्रत्येक मंडल अधिकारी कार्यालय मध्ये करून दिले जाणार असून या कॅम्पच्या आयोजनाबाबत प्रत्येक गावातील सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी लोकांच्या जनजागृती करून लोकांना माहिती देण्याबाबत महसूल विभागाने सुचनाही केल्या आहेत .
तरी संबंधित कागदपत्रे सादर करून शासन आपल्या दारी या उपक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महसूल विभागाकडून तहसिलदार बाई माने यांनी केले आहे.