
म्हसवड प्रतिनिधी

पत्रकारितेतुन गेले अनेक वर्षे अविरत समाजसेवा करणारे आमचे मित्र एल के सरतापे यांनी लोकसहभागातून केव्हीड मध्ये दोन घास सुखाचे, व कोव्हीड सेटर उभे करुन हजारोना मोफत उपचार व कमी दरात औषधे उपलब्ध करून निस्वार्थी रुग्ण सेवा करुण भुकेल्याला दोन घास मोफत त्याच्या घरात देवून माणुसकी जपणारे एल के यांच्या पावलावर पाऊल त्याचे डाॅक्टर चिरंजीव प्रतिक यांनी ठेवत बुद्ध पोर्णिमे निमत्त मोफत आरोग्य शिबीर तपासणी , मोफत औषध वाटप आणी रक्तदान शिबीर आयोजित करुन लोक हित जपण्याची सामाजिक बांधिलकी मनात ठेवून हे घेतलेल्या शिबीरामुळे अनेक रुग्णांना नक्की फायदा होईल डॉ प्रतिक यांचे हे वैद्यकीय क्षेत्रातील पदार्पणातच सामाजिक कार्याने होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे मत सामाजिक राजकीय क्षेत्रात बरोबर वैद्यकीय क्षेत्रातील ह्रदयरोग तज्ञ डॉ प्रमोद गावडे यांनी शिबिराच्या उदघाटना दरम्यान व्यक्त केले
तथागत गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त म्हसवड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीर , विनामूल्य औषध वाटप तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन डॉ. प्रतीक लक्ष्मण सरतापे यांचे वतीने करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर पंचशील ,बुद्ध, धम्म, संघ वंदना घेऊन, शहरातून रॅली जयभीम युवक मंडळाच्या वतीने काढण्यात आली त्यानंतर मोफत आरोग्य तपासणी व रक्त दान शिबीराचे उदघाटन माण तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर, डॉ प्रमोद गावडे, सौ आरती गावडे,सपोनि अक्षय सोनवणे यांचे हस्ते करण्यात आले तत्पूर्वी मान्यवर मंडळीच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध बौध्दीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून शिबीर तपासणी व रक्तदानास सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट,माजी नगरसेवक कैलास भोरे, माजी नगरसेवक संग्रह शेटे, डॉ राजेंद्र मोडासे वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ डोंबे, संजय टाकणे, जेष्ठ पत्रकार विजय टाकणे, पत्रकार नागनाथ डोंबे,पत्रकार सुशिल त्रिगुणे,पत्रकार सचिन शिंगाडे, अभिजीत भादुले,महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन अरुण मुकिरे, अशोक काळे, दत्ता डावकरे,जगन्नाथ लोखंडे, सह डॉ किर्ती गायकवाड (सरतापे) डॉ सिध्दार्थ गायकवाड, डॉ. अश्वजित मोरे, प्रणव सरतापे जयभीम युवक मंडळाचे पदाधिकारी कुमार सरतापे, अंगुली बनसोडे, उपस्थित होते
यावेळी मोफत आरोग्य तपासणीचा व मोफत औषधाचा लाभ ८४ रुग्णांनी घेतला वडुज येथील रायबोले यांच्या संकल्प ब्लड बॅक व सातारा येथील गलंडे ब्लड बॅक यांना ६३ रक्तदात्यांनी आपले श्रेष्ठ दान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला तर या शिबीरात ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन ,ब्लड शुगर,ई. सि. जी.याची मोफत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली