
औंध प्रतिनिधी-ओंकार इंगळे
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील ENTC (Electronics and Telecommunication) B.Tech पदवी परीक्षेत कु. आयेशा इलियाज पटवेकरी हिने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज, इस्लामपूर येथे दि. १० मे रोजी गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मा. श्री. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते आयेशाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व तिचे कुटुंबीय उपस्थित होते.
कु. आयेशाने आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या यशाने तिच्या पालकांचा, कॉलेजचा तसेच गावाचा अभिमान वाढविला आहे.
तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अनेक मान्यवरांनी तिच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.