महाराष्ट्रात संविधान दिन साजरा करणारे प्रणेते :
माजी आमदार धोंडीराम वाघमारे
म्हसवड वार्ताहर
आज संविधान दिन, महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात साजऱ्या होणाऱ्या या दिवसाच्या काही आठवणी आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे.
स्वतंत्र भारतात लोकशाहीचा पाया रचनारा संविधान दिन हा आपल्या स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाइतकाच महत्वाचा दिन आहे याची जाणीव महाराष्ट्राला करुन दिली ती *माण-फलटण मतदारसंघाचे मा.आमदार दिवंगत धोंडीरामदादा वाघमारे यांनी.*
बरोबर १४ वर्षांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष असताना त्यांनी संविधान दिन साजरा करण्याचे ठरविले. त्यापूर्वी इतक्या मोठ्या ऐतिहासिक दिनाची आठवण कोणत्याच सामाजिक किंवा राजकीय संघटनेला झाली नव्हती. म्हणूनच महाराष्ट्रात प्रथमतःच साजऱ्या झालेल्या या सोहळ्याला तत्कालीन *मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, गृहराज्यमंत्री कृपाशंकरसिंग* व अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा प्रघात तेव्हापासूनच पडला.
आजच्या संविधानदिनाच्यानिमित्त १४ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिनिमित्त साजऱ्या झालेल्या या सोहळ्याच्या आठवणींना आज पुन्हा उजाळा मिळाला.