संशोधन हे समाजभिमुख असणे आवश्यकप्राचार्य नामदेव बिजले

Spread the love


लोणंद: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळणे आवश्यक आहे. अशी संशोधन की ज्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जाते. सर सी. व्ही. रमण हे भारतातीय वैज्ञानिक की ज्यांना. जगातील सर्वात मोठे विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांनी २८ फेब्रुवारी १९२८ मध्ये रमण इफेक्ट चा शोध लावला. म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.” असे प्रतिपादन समता जुनियर कॉलेज आणि आश्रम शाळा पाडेगाव चे प्राचार्य नामदेव बिजले यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद येथे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायन्स असोसिएशन यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, ” नॅनो तंत्रज्ञान हे आज जगामध्ये सर्वत्र वापरले जात आहे. याचा पूर्वीच्या वैज्ञानिकांनी पाया घातला आहे. भारतातील वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांनी रमण इफेक्ट याचा शोध लावला. आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. तरच आपण जगाच्या बरोबरीने संशोधनामध्ये जाऊ. आज आयुर्वेदामध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नॅनो तंत्रज्ञानाचा उपयोग आरोग्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे.”
यावेळी व्यासपीठावरती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सायन्स असोसिएशनचे चेअरमन प्रा. संजय डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्नो रांगोळी, फ्लॉवर ॲरेंजमेंट, मॉडेल प्रेझेंटेशन, क्वीज कॉम्पिटिशन हे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून मालोजीराजे ज्युनियर कॉलेज लोणंद येथील सौ. व्ही. व्ही. मोहिते, प्रा. सौ. जे. एस. बर्गे तसेच न्यू इंग्लिश स्कूल लोणंद च्या प्रा. सौ. एस. टी. ननावरे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत मालोजीराजे जुनिअर कॉलेज व न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज मुलींचे, लोणंद येथील ५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्पर्धकांना रोख प्रथम १००१, द्वितीय ७०१, तृतीय ५०१ रुपये पारितोषिक, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय डांगे यांनी करून दिला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. एस. गायकवाड यांनी केले. मान्यवरांचे आभार सायन्स असोसिएशनचे सदस्य डॉ. स्वप्निल बनकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!