सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांना पितृशोक.

Spread the love

कोरेगाव दि:

सामाजिक कार्यकर्ते व पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांचे वडील अनिल तात्याबा उबाळे वय- ७४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील त्यांच्या मूळगावी वसना नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्री अनिल उबाळे यांनी यापूर्वी वडाळा येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय तसेच पश्चिम रेल्वेमध्ये सेवा बजावली होती. त्यानंतर ल्हासुर्णे या ठिकाणी हॉटेल बापूची बैठक व बालाजी केमिकल्स कंपनीचे ते कामकाज पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले नातवंड पुतणे- सुना असा मोठा परिवार आहे. शनिवार दि: ८ मार्च रोजी नऊ वाजता ल्हासुर्णे या ठिकाणी बौद्ध पद्धतीने रक्षा विसर्जन व जलदान विधी चा कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव रमेश व रुपेश उबाळे यांनी दिली आहे. अनिल उबाळे यांच्या दुःखद निधनाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पॅंथर नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, आ. शशिकांत शिंदे, सो अरुणाताई बर्गे, सुप्रियाताई शिंदे, संदीप शिंदे, संजय गाडे, सचिन देशमुख, सुधीर ठोके, आप्पा तुपे, राहुल बर्गे, ह. भ. प. पुरुषोत्तम कुलकर्णी, डॉक्टर शिरीष जाधव, संतोष जाधव, सदाशिव बनसोडे, महेंद्र गायकवाड, हेमंत भोसले, बौद्धाचार्य मोरे, सोमनाथ शिंदे, इंद्रजीत भोसले, प्रमोद फणसे, विष्णू खताळ, नंदकुमार वाघमारे, रवी फुणसे, एडवोकेट संजय गायकवाड, प्रेमानंद जगताप , सुजाता गायकवाड, संजय काटकर तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सातारा बिल्डर असोसिएशन सह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते अशोकराव उबाळे अण्णा यांचे ते धाकटे बंधू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!