
म्हसवड वार्ताहर

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळावर कडक कार्यवाही होणार अशी माहिती डी वाय एस पी रणजीत पाटील यांनी म्हसवड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केली.
म्हसवड येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे पोलीस स्टेशन म्हसवड व नगरपालिका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी गणेशोत्सव 2025 या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित बैठकीमध्ये येथे बोलत होते .
या वेळेला म्हसवड चे सीईओ सचिन माने , पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तहसीलदार सौ. बाबर व म्हसवड परिसरातील पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते ,पत्रकार व मान्यवर नागरिक या वेळेला उपस्थित होते.
यावेळेला नूतन डीवायएसपी रणजीत पाटील यांचा म्हसवड येथील विविध संघटनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. म्हसवड प्रेस क्लब यांच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याच प्रमाणे मसवडचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस पाटील संघटना व पत्रकार यांच्या वतीने डीवाय एस पी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळेला डीवाय एसपी .रणजीत पाटील म्हणाले मंडळाने नियमावलीचा भंग न करता शांततेने गणेश उत्सव साजरा करावा शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आवाज मर्यादा व नियमांचे पालन करणे हे सर्व गणेश मंडळांना बंधनकारक आहे.
जे गणेश मंडळ नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे. या सर्व सूचनांचे पालन करावे. असे आवाहन यावेळी केले.
यावेळेला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गणेश उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांना नियमाबाबत ची माहिती देऊन शासन नियम समजावून सांगितले व शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन या वेळेला करून गणेश उत्सव हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून या उत्सवाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले
या वेळेला म्हसवड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन माने यांनी म्हसवड परिसरातील मंडळांनी फ्लेक्स लावल्यास त्यांच्या व कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार म्हसवड नगरपालिका परिसरातील मंडळांनी करू नये.
असे या वेळेला त्यांनी आवाहन केले
महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी या वेळेला मंडळाने कायदेशीर नियमा प्रमाणे वीज कनेक्शन घ्यावीत व कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले.