अनाधिकृत बस थांबा, अधिकृत बस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा
म्हसवड दि. २३
सातारा व सोलापुर जिल्ह्यातील सर्वच आगाराच्या एस.टी. बसेस ह्या अधिकृत असलेल्या बसथांब्यावर न थांबता केवळ वाहक व चालकास फुकट जेवन, चहा, नाष्टा मिळत असल्याने अनाधिकृत असलेल्या खाजगी थाब्यावर थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय करीत असुन या अनाधिकृत ठिकाणी प्रवाशांची आर्थिक लुटही होत आहे, तर अधिकृत बस थांब्यावर एस.टी. ची वाट पहाणार्या प्रवाशांच्या रांगा लागत अयल्याचे चित्र असल्याने प्रवाशांची गैरसोय करुन त्यांना तिष्ठीत ठेवणार्या चालक – वाहकांवर सातारा व सोलापुर च्या विभाग नियंत्रकांनी कारवाई करावी अशी मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे.
सातार्याहुन सोलापुरकडे व सोलापुरहुन सातार्याकडे दररोज शेकडो एस.टी. बसेस धावत आहेत यामध़्ये सातारा , कोरेगांव, वाई, पाटण आगाराच्या तर सोलापुर, पंढरपुर, बार्शी आगाराच्या एस.टी. बसेसचा समावेश आहे. सर्वच बसेस चे अधिकृत थांबे हे ठरलेले आहेत, असे असताना या एस.टी. बसेसचे चालक, वाहक हे अधिकृत बसथांब्यावर एस.टी. न थांबवता केवळ धाबाचालक हा आपल्याला फुकट जेवन, चहा, नाष्टा, पाणी देत असल्याने अनाधिकृत थांब्यावर एस.टी. थांबवत आहेत, त्याठिकाणी जवळपास ४० ते ४५ मिनीटे बस थांबवली जात असल्याने प्रवाशांना नाहक तिष्टीत थांबावे लागत आहे. म्हसवड पासुन जर एखाद्या प्रवाशाला पिलीव अथवा पंढरपुरला जायचे असेल अथवा पंढरपुर मधुन म्हसवडला यायचे असेल तर म्हसवड ते पिलीव या दरम्यान असलेल्या एका खाजगी धाब्यावरच या बसेस थांबवल्या जात असल्याने विनाकारण याठिकाणी प्रवासीवर्गाचा वेळ वाया जात आहे. म्हसवड ते पिलीव या दरम्यान असलेल्या एका खाजगी धाब्यावर या गाड्या थांबत असुन याठिकाणी महिला व पुरुषांसाठी कोणतीही सुविधा नाही किमान स्वच्छता गृह नाही त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे, हा अधिकृत बस थांबा नसताना तुम्ही याठिकाणी एस.टी. का थांबवली असे जर एखाद्या प्रवाशाने चालक, वाहकास विचारल्यास त्यास बसायचे असेल तर बसा नाहीतर चालत जावा अशी उध्दट उत्तरे त्यांच्याकडुन दिली जात आहेत. याठिकाणी चालक वाहकास सर्वकाही फुकट दिले जात आहे तर याचठिकाणी जर प्रवासी काही खाण्यासाठी गेले तर मात्र त्यांच्याकडुन अवाच्या सवा रक्कम उकळली जात असल्याचा आरोप प्रवासी वर्गातुन होत आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणुक याठिकाणी होत असल्याने प्रवासी एस.टी. चा प्रवास टाळु लागल्याची वस्तुस्थिती आहे, तर म्हसवड हुन पंढरपुरला जाणारे अनेक प्रवासी आता आपला वेळ व पैसा वाचवण्यासाठी खाजगी गाड्यांचा आधार घेवु लागल्याचे चित्र आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे बिरुद घेवुन धावणार्या एस.टी. कडे केवळ चालक, वाहकाच्या मनमानी कारभारामुळे हरताल फैसला जावु लागली असुन सातारा व सोलापुर च्या एस.टी. विभाग नियंत्रकांनी याठिकाणी लक्ष घालुन अनाधिकृत बस थांब्यावर एस.टी. कशी थांबेल यासाठी प्रयत्न करुन एस.टी. पासुन दुर होत चाललेल्या प्रवासी वर्गास दिलासा द्यावा अन्यथा एक दिवस या मार्गावरुन एस.टी. बसेस रिकाम्याच धावताना दिसतील एवढे मात्र नक्की.
फोटो –
