मसवड वार्ताहर
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथयात्रेसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातून 91 जादा बसेस नियोजन करण्यात आले आहे भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आव्हान दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप दुबल यांनी केले आहे
सिद्धनाथ यात्रा म्हसवड ही दिनांक 2 डिसेंबर रोजी संपन्न होणार असून एसटी महामंडळ सातारा विभागाच्या वतीने व दहिवडी एसटी आगाराने भाविकांच्या सेवेसाठी सर्व मार्गावर जादा बसेस चालवण्याचे नियोजन केलेले आहे कराड मधून दहा बसेस सातारा येथून वीस बसेस फलटण मधून दहा बसेस कोरेगाव पाच बसेस वडूज मधून पंधरा बसेस दहिवडी आगारातून वीस वर्षे चे नियोजन केले आहे तसेच सांगली अकलूज कोल्हापूर कर्नाटक विटा इस्लामपूर मिरज शिराळा पलूस जत तासगाव या मार्गातून वीस जादा बस सोडण्यात येणार आहेत
यावेळी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल म्हणाले की मुंबई परेल मधून म्हसवडला येणाऱ्या भाविकांनी दिनांक 30 नोव्हेंबर ते एक जानेवारी अखेर आरक्षित साधी बसेस उपलब्ध आहेत तसेच नियोजित बसेसही वेळेत सुटणार आहेत
पुण्याला जाणाऱ्या भाविकांनी साठी २ डिसेंबर ते ३ डिसेंबर दुपारी ११:३० वाजता व २ वाजता मसवड चिंचवड पुणे अशा दोन ज्यादा आरक्षित बसेस उपलब्ध आहेत तरी भाविकांनी सदर बसेसचा लाभ घ्यावा असे आव्हान दहिवडी आगार व्यवस्थापक कुलदीप पवार यांनी केली आहे
2 रोजी म्हसवड रथयात्रेसाठी जादा एसटी बसेस सोडणार- दहिवडी आगार प्रमुख
