म्हसवड:: प्रतिनिधी
नाशिक येथे संपन्न झालेल्या 7 व्या राज्यस्तरीय रोप स्किपिंग असोसिएशनच्या स्पर्धेत विविध वयोगटात क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील खेळाडूंनी उज्वल यश संपादन करून गतवर्षाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
राज्यस्तरीय रोप स्किपिंग स्पर्धा नुकत्याच नाशिक येथे संपन्न झाल्या असून या स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थी 12 ते 14 डिसेंबर दरम्यान चंदिगड पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. नाशिक येथे यशस्वी झालेल्या क्रांतिवीर संकुलातील खेळाडूंचा तपशील पुढील प्रमाणे
11 वर्षे वयोगटात शिवराज पोळ याने स्पीडस्प्रिंट क्रीडाप्रकारात – प्रथम क्रमांक, ऋत्विक राजगे, स्पीड स्प्रिंट -तृतीय क्रमांक, आयान मुल्ला, स्पीड स्प्रिंट – द्वितीय क्रमांक, 14 वर्षे वयोगट, तेजस तोरणे, फ्री स्टाईल – द्वितीय क्रमांक, तेहरीम काझी, फ्री स्टाईल तृतीय क्रमांक
सांघिक क्रीडाप्रकार :11 वर्षे मुले स्पीड डबल अंडर रिले – द्वितीय क्रमांक :ऋत्विक राजगे, आयान मुल्ला, आदिनाथ सासणे, शिवराज पोळ, डबल डच सिंगल फ्री स्टाईल प्रथम क्रमांक :अर्णव जळक, ऋत्विक राजगे, वेदांत दिडवाघ, फ्रंट टू फ्रंट : द्वितीय क्रमांक : आयान मुल्ला, शिवराज पोळ,तृतीय क्रमांक आदिनाथ सासणे, वेदांत दिडवाघ
14 वर्षे मुले :स्पीड डबल अंडर रिले : द्वितीय क्रमांक : तेजस तोरणे, यश माने, कौशल गुरव, शौर्य कलढोणे, डबल डच सिंगल फ्री स्टाईल : द्वितीय क्रमांक तेजस तोरणे, यश माने, अर्णव साखरे
फ्रंट टू फ्रंट : द्वितीय क्रमांक शौर्य कलढोणे, अर्णव साखरे,
14 वर्षे मुली स्पीड डबल अंडर रिले द्वितीय क्रमांक : संस्कृती ढाले, सौजन्या डमकले, तेहरीम काझी, श्रुतिका कलढोणे, डबल डच सिंगल फ्री स्टाईल : प्रथम क्रमांक संस्कृती ढाले, सौजन्या डमकले, तेहरीम काझी, श्रुतिका कलढोणे…
खेळाडूंना क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष रोप स्किपिंग असोसिएशन सातारा जिल्हा अध्यक्ष कृषिरत्न प्रा विश्वंभर बाबर, क्रांतिवीर शैक्षणिक संकुलच्या सचिव सौ. सुलोचना बाबर, क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्राचार्य विनसेन्ट जॉन, समन्वयक अभिजित सावंत क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे यांनी अभिनंदन केले.