म्हसवड….प्रतिनिधी
प्रवाशांच्या अनेक दिवसाच्या मागणीला यश आले असून सातारा ते निलंगा एस. टी.बस गाडी नुकतीच सुरू झाल्याने म्हसवड व परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.राज्य परिवहन विभागाच्या निलंगा बस डेपोतर्फे निलंगा ते सातारा व सातारा ते निलंगा अशी नवीन एसटी बस सुरू झाली आहे. सदर एसटी बस म्हसवड येथे येताच शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, केमिस्ट असोसिएशनचे नेते सुरेश काटकर, माण चौफेर चे उपसंपादक पत्रकार विठ्ठल काटकर , डाळिंब रत्न ज्ञानेश्वर सावंत, चेअरमन सुनील गायकवाड, प्रवासी मित्र राजेंद्र ढोबळे, म्हसवड बस स्थानक व्यवस्थापक विश्वास माने, जयवंत लोखंडे, दाऊद मुल्ला, महादेव काटकर, माणिक झगडे इत्यादी मान्यवरांनी सदर बसच्या चालक व वाहकांचा तुरेबाज फेटा बांधून यथोचित सत्कार केला. नव्याने सुरू झालेल्या या एसटी बसमुळे म्हसवड परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. ही बस निलंग्याहून सकाळी आठ वाजता निघून म्हसवड येथे दुपारी चार वाजता पोहोचत आहे. तर साताराहून सकाळी आठ वाजता निघून म्हसवड येथे सकाळी पावणेदहा वाजता येऊन निलंग्याकडे जात आहे. या बसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
सातारा निलंगा एस. टी. बस मुळे प्रवाशांची सोय.