आज हेळवाक-कोयना विभागाच्यावतीने वर्षावास व कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन !
सातारा :(अनिल वीर यांजकडूंन ) भारतीय बौद्ध महासभान्तर्गत पाटण तालुका मुंबई व गाव कोयना विभाग ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.२१ रोजी वर्षावास व कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन डॉ. बाबासाहेब आम्बेडकर भवन,दादर (पूर्व) येथे सकाळी १० वा.करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भंते विशुद्ध बोधी यांचे प्रवचन होणार आहे. यावेळी तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती आयोजक बौद्ध विकास मंडळ यांनी दिली आहे.