दिल्ली येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिला पुरस्कार

प्रतिनिधी-विनोद लोहार
सातेवाडी ता खटाव येथील सरपंच वृषाली विक्रम रोमन यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण आदर्श सरपंच पुरस्कार २०२५जाहीर झाला आहे. सरपंच वृषाली रोमन यांनी आपल्या सरपंच कारकिर्दीत गावात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यास केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, पद्मश्री जितेंद्र सिंग शेट्टी, माजी परराष्ट्र मंत्री मिनाक्षी लेखी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की सातेवाडी येथील सरपंच वृषाली विक्रम रोमन यांनी कोरोना काळात जिल्ह्यातील पहिले आयसुलेशन सेंटर आपल्या गावात सुरु केले होते. गावातील कोरोनाग्रस्त लोकांच्या भेटी घेऊन त्यांना लागेल ती मदत करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी या आयसोलेशन सेंटरला भेट देऊन त्यांचे कौतुक ही केले होते.
त्याच बरोबर गावातील विधवा ही परंपरा संपवण्यासाठी त्यांनी महिलाना सोबत घेऊन हळदी कुंकवाचा मान देण्याचा उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा राबविला होता. पती विक्रम रोमन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विध्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या व सातेवाडी ग्रामस्थांच्या
माध्यमातून सातेवाडी गावच्या विकासासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला. गावातील रस्ते तसेच विविध कामांसाठी हा निधी खर्च करून गावचा विकास साधला आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आज त्यांना दिल्ली येथील डॉ विशाखा सोशल वेल्फर टीम झेनीत राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त महासंघाच्या सहकार्याने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण आदर्श सरपंच पुरस्कार २०२५जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार प्रदान करतेवेळी उद्योजक विक्रम रोमन यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी: दिल्ली येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण आदर्श सरपंच पुरस्कार स्वीकारताना सरपंच वृषाली रोमन, विक्रमशेठ रोमन व इतर मान्यवर.