वडूज…..
- मॅरेथॉन मुळे युवक – युवतींच्यात संचारला उत्साह
▪️ नेटक्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक
प्रतिनिधी वडूज विनोद लोहार
वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या हुतात्मा नगरी वडूज मध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमुळे वडूज शहरात गत आठवड्या पासूनच उत्साहाचे वातावरण तयार झाले होते . धगधगत्या जीवनात आहार , व्यायाम व धावणे किती महत्वाचे हे पटवून देणारी मैत्री – रन – मॅरेथॉन स्पर्धेने वडूजच्या नावलौकीकात भर पडली तर उच्चांकी व उत्साही स्पर्धकांच्या सहभागाने शहरातील वातावरण मॅरेथॉनमय झाले होते . जिल्हा व जिल्ह्या बाहेरून आलेल्या नामवंत स्पर्धकांनी नेटक्या नियोजनाचे तोंडभर कौतुक केले . यावेळी बक्षिस वितरण कार्यक्रमात अनेक सहभागी स्पर्धकांनी’ मैत्री रन च्या नियोजनामुळे हुतात्म्यांच्या भूमीचा नावलौकीक वाढला आहे. तर पुढील काळात विविध उपक्रम प्रस्थापीत करीत हा ग्रुप वडूजसह खटाव तालुक्याचे नाव जागतीक स्तरावर उंचावेल अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या .
पहाटे साडेपाच पासून स्पर्धकांसह नागरीकांसह स्पर्धकांची गर्दी लक्षणीय होती . येथील स्वयंवर मंगल कार्यालया पासून स्पर्धेला सुरुवात झाली. अठरा ते पस्तीस वयोगट ,पस्तीस ते पन्नास वयोगट आणि पन्नास वर्षावरील वयोगटातील हजारो स्पर्धकांच्या संख्येला सकाळी सहा वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली . स्वयंवर मंगल कार्यालय ते भुरकवडी पाच व दहा किलोमीटर अशी स्पर्धा पार पडली. या दरम्यान शहरातील नागरिक व स्पर्धकांनी दिलेल्या योगदानामुळे मॅरेथॉनचे हे वर्ष यशस्वी ठरले. तर मॅरेथॉन रूट सपोर्ट साठी रस्त्या कडील बहुतांशी ठिकाणी उभारलेल्या स्टॉल मधून पाणी , लेमनगोळी , लिंबू पाणी , ओआरएस व चिक्की आदींचे वाटप करण्यात आले. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील मैत्री रन – मॅरेथॉन सुयोग्य नियोजनामुळे वडूज मधील मैत्री रन मॅरेथॉन लक्षवेधी ठरली. दरम्यान वडूजवासीयांनी स्पर्धकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून मार्गाच्या दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात धावपट्टूंचे स्वागत केले. तरुण पिढीला व आबाल वृद्धांना मैदानी खेळांची , व्यायामाची आवड निर्माण व्हावी व शारीरीक तंदुरुस्ती चांगली रहावी म्हणून मैत्री कला व क्रिडा सांस्कृतिक मंडळ यांनी ‘ रन फॉर युनिटीचा नारा देत कार्यकम यशस्वी केला. या मॅरेथॉन दरम्यान शनिवार दि .३०नोव्हेंबर रोजी स्पर्धकांना टी शर्ट सहित साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्पर्धेनंतर आयोजक – प्रायोजकांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना मेडल प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी झुंब्बा नृत्य आणि हलगीचा ताल उपस्थितांना ठेका धरण्या बरोबरीने मंत्रमुग्ध करून केला. अशा निरोगमयी उत्साह प्रज्वलीत करणाऱ्या स्पर्धेचे आयोजन आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया घटना स्थळावरून ऐकावयास मिळत होत्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड . अनिल गोडसे यांनी केले. स्वागत अध्यक्ष नरेंद्र गोडसे यांनी केले . तर आभार डॉ. अजित इनामदार यांनी मानले.यावेळी मैत्री कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
दहा किलोमीटर विजेते स्पर्धक…
वयोगट व नावे अनुक्रमे . .
१८ ते ३५ वयोगट महिला –
१) स्नेहल शिंगाडे’ २ ) राणी वलेकर ३ ) दिशा फडतरे
१८ ते ३५ वयोगट पुरुष –
१ ) महादेव कोळेकर २ ) कुमार मदने ३) अनिकेत देशमुख
३५ ते ५० वयोगट महिला –
१ ) अलमास मुलानी, २ ) माधुरी शिवदे ३ ) दिपाली किर्दत
३५ ते ५० वयोगट पुरुष –
१ ) सुनील शिवडे , २ ) जयंत शिवते ३ ) सुधीर पवार
५० वर्षा वरील महिला –
१ ) नंदिनी भामरे ,२ ) वसुधा वत्स , ३ ) निर्मला काळे
५० वर्षा वरील पुरुष –
१ ) रवींद्र जगदाळे, २ ) पांडुरंग पाटील ३ ) विठ्ठल आरागडे
: मुख्य आयोजक – अंबिका पूजा एंटरप्रायजेस प्रो. आश्विन बोटे
सहप्रायोजक – युनिक डायग्नोस्टिक सेंटर , वडूज
संयुक्त प्रायोजक
शिक्षण महर्षी श्री दादासाहेब जोतीराम गोडसे – पृथ्वीराज गोडसे, सोशल फाऊंडेशन , वडूज
बलंवत ग्रुप
हैबतबाबा एज्युकेशन फौंडेशन , आरफळ सातारा
ओसीएन रियालिटी
ग्लीस्टर एलइडी लाईट
ई – अर्थ ऑकान्ट फायनास – शैलेंद्र पवार
आयडी बी आय बँक
सॉलूट रीवालोशन इनसाईड
स्वयंवर मंगल कार्यालय – अमोल गोडसे


फोटो : वडूजमध्ये मैत्री रन मँरेथाँन स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक( विनोद लोहार)