मंगळवेढा येथे अनुलोम बैठक संपन्न

Spread the love

पंढरपुर (वार्ताहर )

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात
अनुलोमची बैठक संपन्न .

सोमवार दिनांक 28 जुलै रोजी मंगळवेढा येथील शासकीय अधिकारी योजना आणि अनुलोम मित्रांच्या भेटी ,असा सुंदर कार्यक्रम पार पडला
पाटखळ रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालय,मंगळवेढा येथे सर्वप्रथम सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शासकीय योजना अनुलोम मित्रांना सांगणे आणि त्यांचा परिचय अधिकारी वर्गास करून देणे असा कार्यक्रमाचा हेतू असल्याचे पंढरपूर मंगळवेढा भाग जनसेवक रामेश्वर कोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले .
उपविभाग प्रमुख पांडुरंग जी शिंदे साहेब यांनी अनुलोम संस्था स्थापन झाल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून गरजू लोकांना लाभ मिळवून दिल्याचे आपल्या भाषणात उत्तम रित्या सांगितले.
आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या तालुका कृषी अधिकारी सौ.मनीषा मिसाळ( जाधव) मॅडम यांनी आपल्या खास मराठमोळ्या शैलीत अनुलोम मित्रांशी संवाद साधला,आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना मी स्वतः प्रयत्न करून किमान 1 ते 2 लाखाच्या योजना मिळवून देणार असल्याचे ठामपणे सांगितले ,त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची
माहिती देऊन अनुलोम संस्थेला कायम मदत करणार असल्याचे आवर्जून सांगितले .
पंचायत समिती चे कृषी अधिकारी आर.पी.कांबळे साहेब यांनी ही त्यांच्या विभागातील सध्या सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली,त्यानंतर पंचायत समिती मधील परीक्षण विभागाचे विषय तज्ञ ए. एन.कांबळे साहेब यांनी ही योजनांची सुंदर मांडणी केली,पंचायत समिती चे एच.एन.मोरे साहेब यांनी ही विविध प्रकारच्या योजना सांगितल्या,पशुधन विकास अधिकारी डॉ.एच.पी. भाले
साहेब यांनी सध्या सुरू असलेल्या शेळी,मेंढी पालन योजना बाबत उत्कृष्ठ माहिती दिली,तसेच पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे डॉ.एस.एच. लामकाणे साहेब, सहायक कृषी अधिकारी प्रशांत काटे साहेब शेती विमा कंपनीचे अभिजित बिसेन आणि उमेश पळसे साहेबांनी ही चांगले मार्गदर्शन केले.
यावेळी मंगळवेढा शहर आणि तालुक्यातील अनुलोम मित्रांनी आणि इतर सदस्यांनी उपस्थिती दर्शविली.
शेवटी भाग जनसेवक रामेश्वर कोरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!