…म्हसवड वार्ताहर —
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली म्हसवड ते नासिक एसटी बंद करून फलटण नासिक एसटी बस सुरू करण्याचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दबावाखाली फलटण डेपो मैनेजर राहुल वाघमोडे यांचा डाव
प्रवाशांना फलटण येथे अडवून अपशब्द वापरले , प्रवाशांत संतापाची लाट उसळली आहे.
म्हसवड येथील माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्या मागणीवरून पुणे व नाशिक ही बस सेवा सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते नारळ वाढवून सुरू करण्यात आली आहे.
या बसेस ला प्रवाशाचा उदंड प्रतिसाद आहे. दररोज एक लाख रुपये उत्पन्न मिळते आहे.
यात राजकारण आल्याने फलटण येथील वाहतूक नियंत्रण राहूल वाघमारे यांनी म्हसवड नासिक ही बस फलटण येथे अडवून त्यातील प्रवाशांना दमदाटी करून फलटण नासिक बस मध्ये जबरदस्तीने बसविण्याचा आग्रह केला व दमदाटी करून चालक व कंडक्टर ला लागशीट न देता ही बस बंद केली आहे असा शेरा मारुन एसटी अडवून ठेवली व प्रवाशांना खाली उतरवून फलटण नासिक गाडी त बसविण्यासाठी दम बाजी केली.
या मुळं प्रवासातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या डेपो मैनेजर विरोधात म्हसवड पोलीसात तक्रार देण्यात येणार आहे.
अशी माहिती प्रवाशी आटपाडकर यांनी दिली आहे..
इंडीया न्यूज 9 साठी शहाजी लोखंडे म्हसवड.