
म्हसवड वार्ताहर …..
देवापूर येथे दोन गटात हाणामारी, कोयत्याने मारहाण
16 जणांवर म्हसवड पोलीसात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आला आहे
अधिक माहिती अशी,
देवा पूर येथे रेशन दुकानातील माल देण्याच्या कारणांमुळे व बेकायदा रेशनिंग दुकान चालवत असल्याचे तक्रार दिल्याचे कारणावरून दोन गटात ग्रामपंचायत समोर, रेशनिंग दुकान यांचे समोर दोन गटात जबर मारहाण झाली. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत, अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हवालदार पळे, व हवालदार खाडे करित आहेत.
अधिक माहिती अशी,
संजय धोंडीराम बाबर वय 38 यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, गावचे हद्दीत मारुती मंदीराजवळ मी व शंकर गोविंद बाबर चर्चा करत असताना पाठीमागुन शहाजी तुकाराम बाबर, सयाजी तुकाराम बाबर, सागर आनंदा बाबर, ज्ञानदेव रामु बाबर (टेलर), रावसाहेब पांडुरंग बाबर, विजय जनार्दन बाबर, आनंदा लक्ष्मण बाबर, जनार्दन लक्ष्मण बाबर हे आपआपल्या हातात काठ्या, लोखंडी रॉड व दगड घेवुन बेकायदेशीर जमाव जमवुन घेवुन येवुन मी, सागर बाबर याचे विरुध्द बेकायदेशीर रेशनिंग दुकान चालविणे या बाबत तक्रार केल्याचा राग मनात धरुन शहाजी बाबर याने “या दोन्ही हारामखोराना सोडु नका” असे म्हणुन सर्वजन आंगावर धावुन येवुन त्यांनी हातातील काठीने, लोखंडी रॉड व दगडाने आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी शहाजी तुकाराम बाबर याने मोठ मोठ्याने आरडा ओरडा केला व माझा चुलत भाऊ शंकर गोविंद बाबर याचे गचुंडे धरले त्या वेळी शंकर याच्या गळ्यातील चैन शहाजी बाबर याच्या हातात तुटुन आल्यानंतर शहाजी बाबर म्हणाले की, आमचेही लय नुकसान झाले आहे. ते आत्ता आम्ही भरुन काढणार असे म्हणुन हातातील रॉडने शंकर गोविंद बाबर यास डोकीस मारुन गंभीर जखमी केले. व सागर आनंदा बाबर याने त्याचे हातातील लोखंडी रॉडने माझे डोकीत मारुन गंभीर दुखापत केली व त्यांचे सोबतचे सयाजी तुकाराम बाबर, ज्ञानदेव रामु बाबर (टेलर), रावसाहेब पांडुरंग बाबर, विजय जनार्दन बाबर, आनंदा लक्ष्मण बाबर, जनार्दन लक्ष्मण बाबर यांनी त्यांचे हातातील काठी व दगडांनी आम्हाला मारहाण करुन जखमी करुन शिवीगाळ दमदाटी केली आहे म्हणुन माझी 1) शहाजी तुकाराम बाबर, 2) सयाजी तुकाराम बाबर 3) सागर आनंदा बाबर 4) ज्ञानदेव रामु बाबर (टेलर) 5) रावसाहेब पांडुरंग बाबर 6) विजय जनार्दन बाबर, 7) आनंदा लक्ष्मण बाबर 8) जनार्दन लक्ष्मण बाबर सर्व रा. देवापुर ता. माण जि. सातारा यांचे विरुध्द तक्रार आहे.
तर दुसऱ्या तक्रारी बाबत माहिती अशी,
सागर आनंदराव बाबर वय 34 वर्षे रा.देवापुर ता.माण जि. सातारा.
यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,
दिनांक 28/03/2025 रोजी दुपारी 1:00 वा.चे सुमारास देवापुर ग्रामपंचायत समोरील रेशनचे दुकानासमोर संजय धोंडिबा बाबर, हेमंत धोंडिबा बाबर, शामराव तात्याबा बाबर, जालिंदर नामदेव बाबर, जितेंद्र जालिंदर बाबर, उत्तम लक्ष्मण बाबर, शंकर गोविंद बाबर, राहुल बाळासो बाबर यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन माझी चुलती आकाताई शिवाजी बाबर हीचेशी रेशन देणेचे कारणावरुन वाद घालत असताना मी त्यांना समजावण्यासाठी गेलो असता संजय बाबर याने तुझा काय संबंध आहे असे म्हणुन हातातील कोयत्याने माझे कपाळावर मारुन जखमी केले. तसेच जालींदर नामदेव बाबर,जितेंद्र जालिंदर बाबर, उत्तम लक्ष्मण बाबर, शंकर गोविंद बाबर, राहुल बाळासो बाबर यांनी शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने माझे मानेवर , हातावर, पायावर, छातीवर, पाठीवर मारहाण करुन जखमी केले तसेच लाथाबुक्यानी मारहाण करुन झाले झटापटीत संजय बाबर याने माझे गळ्यातील चैन काढली व हेमंत बाबर याने माझे पॅन्टीच्या खिशातील 5000/- रुपये काढुन घेतले म्हणुन माझी त्यांचे विरुध्द तक्रार आहे.
अधिक तपास हवालदार डी.पी. खाडे करीत आहेत