सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा अवैध दारू, ताडी विक्री धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच

180 लिटर ताडी आणि देशी-विदेशी दारू जप्त करून एकाच दिवसात 3 ठिकाणी कारवाई आणि आरोपींवर गुन्हे दाखल.
म्हसवड पोलीस ॲक्शन मोडवर
म्हसवड (वार्ताहर):-
सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीसांनी दारू व ताडी विक्रेत्यांना अटक केली असून दारू व ताडी मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर हकीकत
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू विक्री संपुष्टात आणण्याकरिता धडाकेबाज मोहीम राबविण्यात आलेली असून या अनुषंगाने एकाच दिवसात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवैध ताडी-विक्री व देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या आरोपींवर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल केलेले असून यामध्ये तब्बल 180 लिटर ताडी आणि देशी-विदेशी दारू जप्त केलेली आहे. या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून यापुढेही अवैध धंद्यांवरील कारवाई अशाच पद्धतीने प्रभावीपणे चालू राहणार आहे.
सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सुभाष भोसले, रूपाली फडतरे, मैना हांगे, नीता पळे, सुरेश हांगे, नवनाथ शिरकुळे, युवराज खाडे, हर्षदा गडदे यांनी कारवाई भाग घेतला.