झोपेचे सोंग घेतलेल्या पोलिस प्रशासनास जागे करण्यासाठी सर्व बहुजन समाज बांधवांना एकत्र घेऊन घंटानाद करणार. -सागर
भाऊ यादव

लोणंद – प्रतिनिधी
दलित समाजातील उत्रौली येथील उच्चशिक्षित तरुणाचा अत्यंत अमानुष रितीने छळ करून निर्घृण हत्या करण्यात आली या हत्येने भोर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून दलित सवर्ण यांच्यातील हा अन्याय अत्याचाराचा संघर्ष स्वातंत्र्यानंतरही अजून किती वर्षे चालणार यामुळं दलित समाजातील सामाजिक सुरक्षाच धोक्यात आली आहे अश्या निर्दयी घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन असमर्थ ठरत आहे
दि 08/02/2025 रोजी विक्रम गायकवाड राहणार उत्रौली तालुका भोर या दलित तरुणाची18ते20 वार करून अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आली हत्येनंतर अनुज chawan हा एकटाच आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला या घटनेला साधारण दोन महिने होत आले तरी या खुनाच्या कटात सामील असणाऱ्या इतर आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनास अपयश आलेले दिसते इतर आरोपींना अटक करण्यात यावी व तपास योग्य मार्गाने करण्यात यावा म्हणुन झोपेचे सोंग घेतलेल्या पोलीस प्रशासनास जागे करण्यासाठी भोर पोलीस स्टेशन समोर गुरुवार दि 03/04/2025 रोजी घंटानाद आंदोलन घेण्यात आले आहे
तरी या आंदोलनात सर्व समाज बांधवांनी व आंबेडकरी चळवळीतील सर्व राजकीय पक्षांनी व संघटना यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सागर यादव यांनी केले आहे
डी वाय एस पी तानाजी बर्डे यांना निवेदन पत्र देण्याप्रसंगी सागर भाऊ यादव अध्यक्ष -राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष प्रकाश ओव्हाळ – युवा नेते भोर तालुका अक्षय गायकवाड योगेश गायकवाड अरुण रणखांबे अक्षय यादव तेजस खोपडे ओंकार पवार वैभव गिरे अक्षय खाटपे सुनील जगताप व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते