सातारा अपर जिल्हाधिकारी पदी श्री.मल्लिकार्जुन माने यांची नियुक्ती

Spread the love


(अजित जगताप)
सातारा दि: करुणा काळामध्ये २०१९ रोजी उत्कृष्ट काम करणारे अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी श्री मल्लिकार्जुन माने यांची तात्कालीन राज्यपाल यांच्या हस्ते गौरव झाला होता. तेच मलिकार्जुन माने आता सातारचे नवीन अपर जिल्हाधिकारी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीने सामान्य सातारकरांच्या आशा पल्लवीत झालेले आहेत.
अपर जिल्हाधिकारी श्री.मल्लिकार्जुन माने हे मूळचे उमदीचे आहेत. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तहसीलदार म्हणून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे निवड झाली. त्यानंतर थेट महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी रत्नागिरी जिल्हा राजापूर, श्री विठुरायाच्या पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून काम केले.
कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. याशिवाय सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड जिल्हा रायगड (अलिबाग), सातारा जिल्हा सातारा आणि कोरेगाव प्रांतधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई उपनगर व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ठाणे जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून सेवा केली होती.
सध्या सातारा अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अप्पर जिल्हाधिकारी म्हणून श्री मलिकार्जुन माने यांची नियुक्ती झालेली आहे.
यापूर्वी त्यांनी सातारा जिल्ह्यात काम केले त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आता सध्याच्या घडीला महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असल्यामुळे त्यांना सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक सोपे झाले असल्याचे मानण्यात येत आहे. उद्या सकाळी ते पदभार स्वीकारणार असून त्यांच्या स्वागतासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक मान्यवर त्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


फोटो_सातारचे नवीन अपर जिल्हाधिकारी श्री. मल्लिकार्जुन माने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!