
म्हसवड वृत्तसेवा
म्हसवड परिसरात
नवीन डिजिटल विज मिटर जोडणी थांबवण्यात यावी अशी मागणी वीज ग्राहकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, सातारा जिल्हा नासप चे अध्यक्ष इंजिनिअर सुनील पोरे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेकडे केली आहे.
या मागणीच्या प्रति म्हसवड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दिल्या आहेत. यावेळीइंजिनिअर सुनील पोरे,
विजय चांडवले, संदिप नामदास, शार्दुल फुटाणे,पोपट बनसोडे, विजय टाकणे,उपस्थित होते.
एम एस ई बी कार्यालयाकडुन सध्या विज ग्राहकांच्या घरी त्यांची मागणी नसतानादेखील जबरदस्तीने डिजिटल विज मिटर बसवण्याची प्रकिया सुरु आहे, याला वास्तविक विज ग्राहकांचा तीव्र विरोध आहे. वीज मंडळ जे डिजीटल मिटर ग्राहकांना देत आहात त्याबाबत विज ग्राहकाच्या प्रचंड तक्रारी असुन त्याचे विजबील हे सध्याच्या विजबीलापेक्षा सरासरी ५ पट अधिक येत आहे त्यामुळे अशा डिजीटल मिटर ला ग्राहकांचा तीव्र विरोध होत आहे.
ग्राहकांचा हा विरोध डावलून वीज मंडळ कर्मचारी ग्राहकाच्या घरी कोणी नसताना त्यांची इच्छा नसताना गुपचुप हे डिजीटल मिटर बसवत आहेत. हे पुर्णपणे चुकीचे व बेकायदेशीर आहे, वास्तविक विज ग्राहकाची इच्छा नसताना वीज मंडळ त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करु शकत नाही त्यामुळे वीज मंडल कार्यालयाकडुन म्हसवड व पालिका हद्दीत सुरु असलेली ही जबरदस्तीची विज मिटरची प्रक्रिया त्वरित थांबवण्याचे आदेश वीज मंडळास द्यावेत .
अन्यथा याच विज ग्राहकांना सोबत घेवुन आम्ही वीज मंडळ कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकावे लागेल ,
ही वेळ येवु नये यासाठी महावितरण अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत ही विनती इंजिनिअर सुनील पोरे यांनी ग्रामविकास जयकुमार गोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.