
(अजित जगताप)
दहिवडी दि: दुष्काळी माण खटावच्या मातीत बोराट वाडीचे सुपुत्र युवा नेते शेखरभाऊ गोरे यांचा बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी वाढदिवस आहे. या दिवशी कुणीही भेटवस्तू आणू नये तसेच बॅनरबाजीला बंदी आणण्याची घोषणा करणारे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहेत. या त्यांच्या भूमिकेचे जनतेतून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे आक्रमक बंधू म्हणून पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात युवा नेते शेखर भाऊ गोरे प्रसिद्ध आहेत. स्वखर्चाने माण खटावच्या दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे टँकरने पुरवठा केला आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना अडीअडचणीच्या वेळेला किंवा अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत व्हावी यासाठी स्वखर्चाने रुग्णवाहिकेची सेवा केलेली आतापर्यंत पाच ते सहा हजार रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचण्याची माहिती काही रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य निरोगी राहावे यासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. बॅनरबाजी ने गाव पातळीवर विद्रूपीकरण होत आहे. अनेकदा युगपुरुषांच्या प्रतिमा अशा बॅनरबाजी मुळे झाकले जातात. यावर समाज माध्यमातून सडकून टीका होते. याची जाणीव ठेवून त्यांनी बॅनरबाजी बंदीचा घेतलेला निर्णय दिशादर्शक ठरलेला आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांच्या आमदारकीच्या पहिल्या २००९ व २०२४ च्या निवडणुकीतील विजयात शेखर गोरेंचा मोठा वाटा आहे. त्यानंतर शेखर गोरेंनी माण पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि ते निवडून आले. तेथूनच त्यांनी स्वतः:चे राजकीय अस्तित्व निर्माण केले. भाजप नेत्याने त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता. शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाणी टंचाई भासणाऱ्या गावांना मोफत टॅंकर तसेच जनावरांना चारा उपलब्ध करून देणे व इतर विकासाची कामे त्यांच्या स्वनिधीतून करतात. अनेकांना व्यक्तिगत पातळीवर मदत करून माणुसकी जपणाऱ्या या नेत्यांमुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे वारे वाहिले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. दहिवडी येथील शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये बुधवार दि 2 एप्रिल सकाळी दहा ते दुपारपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी युवा नेते शेखर भाऊ गोरे माण खटाव मतदार संघात थांबणार आहेत . अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय अनेक कार्यकर्त्यांनी दिली आहे.
फोटो- युवा नेते शेखर भाऊ गोरे