युवकानी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे— प्रा. युसुफ मुल्ला

Spread the love

युवकानी डिजिटल साक्षर होणे ही काळाची गरज आहे— प्रा. युसुफ मुल्ला


मुरुम प्रतिनीधी-
युवकांनी इतर कौशल्यासोबतच डिजिटल साक्षर असणे ही आज काळाची गरज असुन त्यासाठी शासन सुद्धा अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे. विद्यार्थ्यांनी अशा योजनाचा लाभ घेऊन स्वतः साक्षर होणे हि काळाची गरज़ असल्याचे मत मायक्रोकॉमचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांनी व्यक्त केले.
श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा
राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर जकेकुरवाडी येथे चालू असून या गुरूवारी (ता.१६) शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.युसुफ मुल्ला यांनी “डिजिटल लिटरसी ही काळाची गरज” या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
तंटामुक्त समितीचे सदस्य तानाजी पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.गिरीधर सोमवंशी, डॉ.भरत शेळके, प्रा. मुरलीधर जाधव, प्रा.डी.डी पांढरे, प्रा.एम.डी.गायकवाड डॉ. व्ही. एम.गायकवाड,डॉ. एस. एल राठोड,डॉ आर. एम. सूर्यवंशी प्रा. एस आर. चव्हान,प्रा.विजय पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. मुल्ला म्हणाले की,
आज संगणकाने माणसाचे सारे जीवनच व्यापून टाकले आहे. पोस्ट सेवा, बँका, आणि विविध कार्यालयांतील सर्व कामे आत्ता संगणकाद्वारेच केली जातात. ग्राहकांच्या खात्यामध्ये किती ठेव शिल्लक आहे हे आत्ता एका क्लिकवर समजते. रेल्वे, विमाने, चित्रपट यांसारख्या तिकिटांचे आरक्षण संगणकाद्वारेच घरबसल्या करता येते. आजकाल सर्व महत्वाच्या परीक्षा या संगणकाद्वारेच घेतल्या जातात संगणकाद्वारे नोकरीबरोबरच कार्यालयातील कामे सुद्धा काही जन घरीच बसून करतात आणि इंटरनेट च्या मदतीने कार्यालयात पाठवतात असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भरत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन शेखर सूर्यवंशी यांनी केले तर उपस्थित आमचे आभार अभिषेक मिसाळ यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!