
मायणी प्रतिनिधी—-
सोन्याचा ठेवा असलेली स्वर्गीय प्रताप शेठ दादा साळुंखे यांची 85 वी जयंती मायणी येथील शिवप्रताप पतसंस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरी झाली प्रारंभी संस्थेचे शाखाधिकारी सतीश कोकाटे यांनी दादांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले त्यानंतर ते आपल्या भाषणात म्हणाले दादांनी वयाच्या तेराव्या वर्षी सोने-चांदी व्यवसायात सुरुवात केली त्यांनी आपल्या आयुष्यात देशातील गिलाय बांधवांना एकत्र करून त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दिल्ली दरबारी मांडले 2002 मध्ये शिवप्रताप मल्टीस्टेट या पतसंस्थेची स्थापना करून या संस्थेच्या 23 शाखा कार्यरत आहेत साडेसातशे कोटीचा संमिश्र व्यवहार के केला आहे गरिबांच्या हाताला काम, शेतकऱ्यांना मदत, तसेच शेतकऱ्यांना वाजवी दरात खते मिळण्यासाठी शिवप्रताप कृषी मॉल सुरू केला असून कोरोना काळात मेडिकल कॅम्प उभा करून समाजसेवेचा ठसा जोपासला आहे याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण धोंडराम मासाळ, घोटी कर बंधू, प्राध्यापक दिलीप पुस्तके, पीएसआय कांबळे साहेब, तसेच संस्थेचे सभासद, ठेवीदार, खातेदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते