राज्य माहिती आयुक्त पदी प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती.

Spread the love


म्हसवड…प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या माहिती आयुक्त पदी राज्य प्रशासनातील निवृत्त उपसचिव प्रकाश इंदलकर यांची नियुक्ती झाली असून या निमित्ताने माण तालुक्यातील सुपुत्राचा राज्य प्रशासनात उच्चपदी सन्मान झाला आहे.
प्रकाश इंदलकर हे उकिरडे महिमानगडचे सुपुत्र असून राज्य प्रशासनात त्यांनी 32 वर्षे सेवा केली आहे. आदर्श प्रशासक तसेच सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी म्हणून प्रकाश इंदलकर यांचा नावलौकिक आहे. वॉटर कप च्या माध्यमातून उकिरडे महिमानगड व परिसरात जलसंधारणाच्या कामात यांचा सक्रिय सहभाग होता. कोविड महामारीच्या कालावधीत आपल्या पदाच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी व सर्वसामान्य रुग्णाला अत्यंत मोलाचे आरोग्यविषयक महत्वपूर्ण सहकार्य केले होते. मंत्रालयात महसूल अवर सचिव म्हणून क्षेत्रीय आस्थापना विभागात त्यांनी उल्लेखनीय सेवा केलेली आहे. सेवानिवृत्तीनंतरही प्रकाश इंदरकर यांच्या सेवेचा सन्मान म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांना आपल्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू करून घेतलेले होते. आता नव्याने राज्याचे माहिती आयुक्त म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली असून या निमित्ताने राज्यस्तरावर माण तालुक्याचा सन्मान झालेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक, तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी प्रकाश इंदलकर यांच्या कार्याची दखल घेऊन नवीन संधीसाठी सहकार्य केले. इंदलकर कुटुंबातील अनेक व्यक्ती
राज्याच्या प्रशासनात असून त्यांचे चिरंजीव प्रतीक प्रकाश इंदलकर भारतीय वन सेवेत कार्यरत आहे. माजी सनदी अधिकारी सुरेश जाधव, माजी अप्पर राज्यकर आयुक्त विलास इंदलकर , जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, जॉईंट कमिशनर उत्तमराव इंदरकर , नौदल कॅप्टन जयवंत इंदलकर,
कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, राजेवाडी चे सरपंच प्रशांत शिरकांडे ,महिमानगड पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नूतन माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!