
म्हसवड वार्ताहर …
स्वाभिमानी शेतकरी संघटनेते राजू शेट्टी यांच्या हस्ते सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी बद्दल रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माननीय राजू शेट्टी साहेब यांच्या हस्ते ऐतिहासिक काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी साताऱ्यातूनच उठाव झाला होता त्याच पद्धतीने असंवेदनशील केंद्रातील भाजपचे सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेतुन घालवण्यासाठी तुम्ही नक्की ऐतिहासिक क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातून उठावाची सुरुवात कराल अशा आशीर्वाद रुपी शुभेच्छा ही राजू शेट्टी यांनी या वेळेला रणजित देशमुख यांना दिल्या.
..
रणजितसिंह देशमुख यांना राजू शेट्टी यांनी दिल्या
केंद्रातील भाजपचे सरकार आणि राज्यातील महायुतीचे सरकार सत्तेतुन घालवण्यासाठी शुभेच्छा.
…..