
वडूज नगराध्यक्षपदासाठी नेत्यांचा
शब्द प्रमाण की रस्सीखेच?
वडूज : प्रतिनिधी- विनोद लोहार
वडूज नगरपंचायतीच्या
नगराध्यक्षपदासाठी नगरसेविका सौ.
रेश्मा श्रीकांत बनसोडे व सौ. स्वप्नाली
गणेश गोडसे यांनी अर्ज दाखल केले. आहेत
्यामध्ये नेत्यांच्या आशिर्वादाने नगराध्यक्ष पदाच्या
अलगद रेशीमगाठी बांधल्या जाणार की घोडाबाजार करून बाजी मारली जाणार याकडे
शहरवाशियांचे लक्ष लागून राहिले आहे. नगराध्यक्षा मनिषा रविंद्र काळे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पदाचा
राजीनामा दिल्यानंतर प्रशासनाने नूतन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सौ. बनसोडे व सौ. गोडसे यांनी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे अर्ज दाखल केले
आहेत. बुधवारी दि. २६ रोजी अर्ज
माघार घेण्याची मुदत आहे. या मुदतीत दोघींपैकी एकीने अर्ज माघारी घेतला तर निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र दोन्ही अर्ज रिंगणात राहिल्यास शुक्रवार दि. २८ रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.